आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजे भोसले यांचे आव्हान:‘कडेलाेट पॉइंटवरून उडी मारा, घेताय चॅलेंज ?’

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साताऱ्याचे भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे चुलत बंधू जावली-सातारचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत.

जर भ्रष्टाचार सिद्ध झाला, तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंटवरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकला नाही तर त्यांनी उडी मारावी, असे आव्हान उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे यांना दिले आहे. सातारा नगर पालिकेच्या वतीने पालिकेच्या नूतन इमारतीचे बांधकाम सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीसमाेर सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी खा. उदयनराजे आले होते.

बातम्या आणखी आहेत...