आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त:नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल; कालीचरण महाराज यांची मुक्ताफळे

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कालीचरण महाराजांनी रायपूर येथील धर्मसभेत महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना 95 दिवस गजाआड देखील राहावे लागले. मात्र, त्यानंतरही त्यांची वादग्रस्त विधानाची मालिका संपलेली नाही. आता नथुराम गोडसेचे समर्थन करुन त्यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे.

आता काय म्हणाले?

आज कालिचरण महाराज पुन्हा बरळले आहेत. ते म्हणाले, नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते. महात्मा नथुराम गोडसे नसते तर धर्म बुडाला असता. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

लहानपणापासून अध्यात्माकडे ओढा

कालीचरण महाराजांचे मूळ नाव अभिजीत धनंजय सराग असून ते अकोला शहरातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंचबंगला भागात राहतात. ते एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडीलांचे औषधांचे दुकान आहे. कालीचरण महाराजांचा लहानपणापासून अध्यात्माकडे अधिक ओढा होता. कालीचरण महाराजाने जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

वादग्रस्त वक्तव्यांची मालिका

  • याआधी कालीचरण महाराजांनी रायपूर येथील धर्मसंसदेत महात्मा गांधींसंदर्भात खालच्या पातळीवर वक्तव्य केले होते. त्यांनी भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवले होते. महात्मा गांधींचा एकेरी शब्दात उल्लेख करून त्यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना वंदन करतो, असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले होते.
  • अलिगढ येथे भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत. भारत पाकिस्तान युद्ध झाले तर इथले मुसलमान पाकिस्तानला साथ देतील, असे वक्तव्य केले होते.
  • अहमदनगर येथे कालीचरण महाराज म्हणाले, लव जिहादासाठी वशीकरण आणि जादूटोण्याचा वापर केला जातो. आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या, मग बघा डोके ठिकाणावर येईल, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
  • देवी देवता हिंसक होते, म्हणून आपण त्यांची पूजा करतो. देशासाठी आणि धर्मासाठी हत्या केली तर त्यात गैर काहीच नाही, असे वक्तव्य अमरावती येथे शौर्य यात्रेत केले होते.