आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य दि कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली आहे. सुमारे ३१० कोटींचा अपहार झाल्याने आणि नियमबाह्य कामे केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सोमवारी रात्री उशिरा बँकिंग परवाना रद्द केला. याबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हजारो ठेवीदार आणि सभासद हवालदिल झाले आहेत. उपनिबंधक मनोहर माळी यांची बँकेवर अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना सोमवारी रात्री उशिरा रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. त्याची स्थळप्रतही बँकेच्या मुख्य दरवाजावर लावण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार पाच लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. बँकेच्या २९ शाखा असून प्रामुख्याने मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत आहेत. बँकेचे ३२ हजार भागधारक आहेत, तर लाखावर खातेदार आहेत.
राष्ट्रवादी नेत्याच्या ताब्यातील बँक
सहकार क्षेत्रातील सर्वात जुनी व अग्रणी बँक म्हणून कराड जनता सहकारी बँकेची ओेळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील दिग्गज नेते राजेश पाटील वाठारकर तिचे अध्यक्ष होते. तेच बँकेचे सर्वेसर्वाही होते. राजेश पाटील यांनी पदवीधर मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली होती. त्यांचे वडील विलास वाठारकर हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही होते.
वर्षभरापूर्वी संचालक मंडळ झाले बरखास्त
२०१७ ते २०१९ या निर्बंधांच्या काळात बँकेने अनेक नियमबाह्य कामे केली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने २०१९ मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. यामुळे बँकेने केलेला ३१० कोटींचा अपहार, इतर गैरव्यवहार उघडकीस आले. आर.जी. पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिस तपासाचे आदेश दिले होते. सोमवारी रात्री गुन्हा नोंद झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.