आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पाणी डाेक्याच्या वर:तीव्र विरोधानंतरही कर्नाटक अलमट्टीची उंची वाढवणार, कंत्राटही प्रसिद्ध, सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधीच सीमाप्रश्न पेटलेला असताना कर्नाटकने त्यात आणखी तेल ओतले आहे. महाराष्ट्र सरकारचा विरोध डावलून कर्नाटक शासनाने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे कंत्राट प्रसिद्ध केले. यामुळेे दक्षिण महाराष्ट्रातील जनता दरवर्षी येणाऱ्या महापुराच्या भीतीने हादरली आहे.

अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. आधीच कृष्णा नदीचा फुगवटा सांगलीपर्यंत पोहोचतो. खोऱ्यातील सर्वच नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक उंचीने वाहून सांगली व कोल्हापुरातील हजारो हेक्टरवरची पिके वाहून जातात. सुमारे दीड ते दोन लाख लोकांना फटका बसतो. ५ लाख लोकांना विस्थापित व्हावे लागते. आता कर्नाटकने उंची ५२४.२५ मीटरपर्यंत वाढवल्यास सांगलीत ६ लाखांवर लोकांना स्थलांतर करावे लागणार आहे.

महाराष्ट्रासह आंध्रची हरकत
उंची वाढीस आंध्र शासनानेही हरकत घेतली आहे. कृष्णेच्या हक्काच्या पाण्याला मुकावे लागेल, अशी भीती आंध्रने व्यक्त केली. दरम्यान, कर्नाटकच्या कृष्णा जल निगमचे मुख्य अभियंता एच. सुरेश यांनी ‘दिव्य मराठी’शी दावा केला की ‘धरणाची उंची वाढवण्यासाठी अद्याप निविदा मागवलेल्या नाहीत. मात्र, २६ दरवाजे बदलण्याचे काम तातडीने सुरू केले आहे. तसेच या धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा वापरता येतील का? यासाठीच तज्ज्ञांकडून अहवाल मागवला आहे. दरवाजे वाढवले तर फायदा-तोटा काय होईल, यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येत आहे.’

बातम्या आणखी आहेत...