आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, कोल्हापूरला जाणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असतानाही सातारा जिल्ह्यातील कराड स्टेशनवर पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे चार तास गव्हर्नर सर्किट हाऊसमध्ये ठेवल्यानंतर त्यांना पोलिसांनी सोडून दिले. त्यांच्यावर कलम 144 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुंबईहून कोल्हापूरला जात होते. 13 सप्टेंबर रोजी सोमय्या यांनी ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ते आपल्या काही साथीदारांसह या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापूरला जात होते. सर्किट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.
घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणे, हे लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे. तक्रारदाराला रोखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम, गणेश विसर्जन करण्यापासून रोखणं, मला माझ्या कार्यालयात कोंडून ठेवणं हे कोणत्या आदेशातंर्गत केलं हे मला दिलीप वळसे पाटील यांना विचारायचे आहे? घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला जर अटक केली जात असेल, तर उद्धव ठाकरे सरकारचा हा उद्धटपणा जास्त दिवस चालू देणार नाही असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखणं, पोलिसांनी नोटीस बजावणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ठाकरे सरकारचे पोलिस खोटी ऑर्डर दाखवतात - सोमय्यांचा आरोप
पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत सोमय्या म्हणाले की, मला ट्रेन मिळू नये यासाठी मला स्टेशन बाहेर अडवलं गेलं, सीएसएमटीमध्ये मला धक्काबुक्की केली गेली. मला कोणत्या नियमातंर्गत अडवलं असे विचारल्यावर ते मला कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे पत्र दाखवतात. त्या ऑर्डरला चँलेंज केल्यानंतर ते तेथून पळून गेले. ठाकरे सरकारचे पोलिस खोटी ऑर्डर दाखवून व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही असे सोमय्या म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.