आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी दोन दिवसांनी कोल्हापूरला जाणारच, कराडात सोमय्यांचा ठाकरे-पवारांवर हल्लाबोल

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला गैरकायदेशीर अडवून ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. ना. हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर येथे आज आगमन होणार आहे. ते दवाखान्यात होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यात किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा झाला तर दौ-यात गनिमी काव्याने हल्ला होऊ शकतो असे लेखी पत्र मला दिले. माझ्यावर हल्ला कोण करणार? हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करणार होते. ते कोण गुंड आहेत का? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केला.

भाजप नेते किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस ने कोल्हापूर कडे चालले असता कराड ( ओगलेवाडी ) रेल्वे स्टेशन येथे पोलिसांनी त्यांना उतरण्यास सांगितले. व ताब्यात घेतले. त्यानंतर ते मुंबई ला जाण्यास तयार झाले. त्यानंतर किरिट सोमय्या हे कराड येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. सातारा व कोल्हापूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. सकाळी नऊ वाजता कराड येथे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. कराड रेल्वे स्थानकावर भाजपचे कार्यकर्ते पहाटे जमले होते. त्यानंतर सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या बोलत होते.

पारनेर, जरंडेश्वरला जाऊन पाहणी करणार
आता मी पारनेरच्या कारखान्याला भेट देणार आहे. त्या कारखान्यातही कोट्यावधींचा घोटाळा झाला आहे. 30 तारखेला अजित पवार यांनी घेतलेल्या जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करायला मी जाणार आहे.

तक्रार करायला कागलला जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दडपशाही सुरू आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा या दडपशाहीला जबाबदार आहेत.

सरसेनापती कारखाना कोल्हापूर हद्दीत असल्याने मला तिथेच तक्रार करावी लागणार आहे. हा घोटाळा काढण्यासाठी मला कोल्हापूरला जावे लागणार आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यासाठी मला कागल पोलीस स्टेशनला जावे लागणार आहे असे मला माझ्या वकिलांनी सांगितले आहे. राहिला मानहानीच्या दाव्याचा प्रश्न आत्तापर्यंत सात दावे माझ्यावर झाले आहेत असेही सोमय्या यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...