आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळताना गव्हाच्या पिठात पडला:9 महिन्याच्या चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू, कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळताना गव्हाच्या पिठात पडल्याने 9 महिन्याच्या चिमुकल्याचा करुण अंत झाला आहे.

कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे तालुक्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

अचानक पिठात पडल्याने या चिमुकल्याच्या नाका, तोंडात पीठ गेले. त्यामुळे काही क्षणांतच गुदमरुन या चिमुकल्याचा मृत्यू झाला. काल शुक्रवारी (ता. 3) ही हृदयद्रावक घटना घडली.

कृष्णराज राजाराम यमगर असे या चिमुकल्याचे नाव आहे. करवीर तालुक्यातील जुना वाशीनाका येथे ही घटना घडली.

आजीकडे आला होता

घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे राहणाऱ्या सुप्रिया राजाराम यमगर या आपला नऊ महिन्याचा मुलगा कृष्णराज याला घेऊन करवीर तालुक्यातील वडणगे येथे आपल्या आजीकडे आल्या होत्या.

वॉकरमधून चालता चालता...

दरम्यान, काल संध्याकाळच्या सुमारास कृष्णराज वॉकरमधून चालत खेळत होता. मात्र, चालता-चालता जमिनीवरच ठेवलेल्या गव्हाच्या पिठाच्या भांड्यात तोल गेला आणि तो त्यात पडला. आजीने त्याला त्वरित त्या भांड्यातून बाहेर काढले.

नाका-तोंडात पीठ गेले

मात्र, भांड्यामध्ये पीठ मोठ्या प्रमाणात असल्याने कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ गेले. हे पीठ कृष्णराजच्या नाका-तोंडात चिकटून बसले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात प्रचंड अडचणी येत होत्या.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

कृष्णराजच्या नाका तोंडात पीठ गेल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी कृष्णराजला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, दवाखान्यात नेण्यापूर्वीच चिमुकल्या कृष्णराजचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चिमुकल्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...