आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे-फडणवीसांची भेट:कोल्हापूर दौऱ्यावर असताना समोरासमोर आले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, दोघांमध्ये पूरपरिस्थितीवर झाली चर्चा

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बैठक बोलावली तर आम्ही यायला तयार आहोत - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. असे असताना दोघांची शाहूपुरीत भेट झाली. अवघ्या पाच मिनिटांसाठी या दोघांची भेट झाली. या भेटीवेळी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोघांमध्ये काही चर्चा झाली, या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सर्व काही स्पष्ट केले आहे.

भेटीमध्ये ठाकरे-फडणवीसांमध्ये काय झाली चर्चा?
या भेटीमध्ये दोघांमध्ये काय चर्चा झाली याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'आमची त्या ठिकाणी एवढीच चर्चा झाली की, या परिस्थीवर काहीतरी कायमस्वरूपी उपाय व्हायला हवा. तातडीची मदत तर तत्काळ दिलीच पाहिजे.मात्र अशा घटना पुन्हापुन्हा घडत आहेत, त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना त्यावर होऊ शकते का? हा प्रयत्न करण्यात आला पाहिजे. तसेच, त्यांनी जर बैठक बोलावली तर आम्ही यायला तयार आहोत, असे मी त्यांना सांगतिले आहे.'

शाहूपुरीतील बाजारामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील होते. तर देवेंद्र फडणवीसांसोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...