आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूरवरुन गोव्याच्या दिशेने जाणारा शीतपेयांचा कंटेनर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुईखाडीच्या घाटात उलटला. ही घटना करवीर तालुक्यातील पिराचीवाडी परिसरात घडली. दरम्यान अपघातग्रस्त रस्त्यावर मदतीऐवजी शीतपेयांच्या बाटल्या नेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून देण्यात आली. मात्र येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांनी मदत करायची सोडून शीतपेयांच्या पडलेल्या बाटल्या पाहिल्यानंतर त्या लुटायला गर्दी केली. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यामध्ये कोल्डड्रिंक्सचा कंटेनर रस्त्याकडेला पलटी झाल्याचे दिसून येत आहे. तर कोल्डड्रिंक्सच्या बॉटल्स पळवून नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. आपल्या आवडीच्या कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या नेण्यासाठी काहींनी तर आपल्या दुचाकीवरून हजेरी लावली आहे. तरूणांसोबतच ज्येष्ठही कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्या उचलण्यासाठी धडपड करत होते.
काही कोल्डड्रिंक्स प्रेमींनी तर आपल्या दुचाकीवर कोल्डड्रिंक्सचे ट्रे ठेवून तर काहींनी पोती भरून बाटल्या पळवून नेल्या. काहींनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला रूमाल बांधून बॉक्सच्या बॉक्स भरून बाटल्या पळवल्या. त्यामुळे अपघात एकीकडे आणि दुसरीकडे कोल्ड ड्रिंक्ससाठीची गर्दी असे चित्र पाहायला मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.