आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विळखा:कोल्हापुरातील काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करत दिली माहिती

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच काळात राजकारणातील अनेक बड्या व्यक्तींना कोरोनाने विळखा घातल्याचे आपल्याला दिसतेय. अशात आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ट्विट करत त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.

ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे विधानसभा आमदार आहेत. ऋतुराज यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

ऋतुराज पाटील म्हणाले की, 'माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.'

दरम्यान ऋतुराज पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहान ऋतुराज पाटलांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...