आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील कोरोना पॉझिटिव्ह - संपर्कात आलेले अधिकारी क्वारंटाईन

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांच्यावर आता कोल्हापुरात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना महामारीचा प्रार्दुभाव वाढत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनादेखील कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, बजरंग पाटील हे शुक्रवारी झालेल्या जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांची मात्र आता चांगलीच धावपळ उडाली असून हे अधिकारी आता क्वारंटाईन झाले आहेत.

शुक्रवारी जलव्यवस्थापन बैठकीला उपस्थित राहिलेल्या अध्यक्ष बजरंग पाटील यांना सर्दी, ताप आणि खोकला ही कोरोनासदृष्य लक्षणे दिसल्याने त्यांची कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) करण्यात आली. या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर आता कोल्हापुरात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...