आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री क्षेत्र आदमापूर येथून मुलाचे अपहरण करणाऱ्या संशयित अपहरणकर्त्यांना 48 तासात बेड्या ठोकून कोल्हापूर पोलिसांनी मुलाची सुखरूप सुटका केली. यानंतर मुलाला आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
पोलिसांकडून प्राप्त माहीतीनुसार, मोहन अंबादास शितोळे आणि त्याची पत्नी छाया मोहन शितोळे (दोघेही राहणार मूळचे मेडा जावळी, जिल्हा सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. सुषमा राहुल नाईक नवरे (रा.शिवाजीनगर, खंडाळा, जि. सातारा) या त्यांच्या सहा वर्षीय मुलासह ३ मार्चला श्री क्षेत्र आदमापूर येथे देवदर्शनासाठी आले होते. त्यादिवशी मुक्काम करून ते दुसऱ्या दिवशी आंघोळीसाठी गेले.
मुलगा एकटा असल्याची संधी साधत त्यांच्या सहा वर्षीय लहान मुलाचे अपहरण संशयितांनी केले. यानंतर पालकांनी मुलाचा शोध घेतला पण तो आढळून आला नाही. त्यानंतर पालकांनी भुदरगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा
कोल्हापूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सात तपास पथक तैनात करून तपासासाठी विविध दिशेला पाठवण्यात आली होती. पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. मंदिरातून आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासात संशयित आरोपी हा त्याच्या दुचाकीवरून एका महिलेसह मुलाला घेऊन भुदरगड हद्दीतून कर्नाटक हद्दीत निपाणी, चिकोडी, अंकली, चिंचणी, मायाका, मार्गे मिरजकडे गेल्याचे आढळून आले.
गाडी क्रमांकावरून संशयितांना शोधले
पोलिसांनी गाडीचा नंबर घेत तांत्रिक दृष्ट्या पोलिसांनी तपास करत माहितीच्या आधारे आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. संशयित मोहन अंबादास शितोळे आणि पत्नी छाया शितोळे हे दोघे मूळचे (मेढा, जावळी) सातारा येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे तपास केल्यावर दोघेही सध्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळी येथे राहत असल्याचे समोर आले.दरम्यान, सांगोला पोलिसांना याबाबतची माहिती कळवत त्वरित सदर दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आणि सहा वर्षीय अल्पवयीन मुलाला ही ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचवले.
मुलाची सुखरूप सुटका
पोलिसांनी अवघ्या 48 तासांत संशयित आरोपींना ताब्यात घेत मुलाची सुखरूप सुटका केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांकडून तपास पथकाला बक्षीस म्हणून पंचवीस हजार रुपयेही जाहीर केले आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.