आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येपूर्वी या युवतीने दोन सुसाईड नोट लिहिल्या असून त्यामध्ये त्रास देणाऱ्या मुलास फाशीची शिक्षा व्हावी असे नोंदवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बोंद्रेनगर येथे ही घटना घडली. नकुशा साऊ बोडेकर (वय 19, रा. ओम गणेश मंडळ, बोंद्रेनगर) असे तरुणीचे नाव आहे. नकुशाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये तरुणाकडून होत असणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तर त्रास देणाऱ्या तरुणाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नकुशाच्या नातेवाईकांनी घेतली होती.
नातेवाईकांच्या घरात आत्महत्या
नकुशाने दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर परिसरात घरकाम करून कुटुंबाला मदत करत होती. चार दिवसांपूर्वी ती नातेवाईकांकडे बोंद्रेनगरमधील घरी आली होती. बुधवारी घरी कोणी नसताना तिने छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने नातेवाईक घरी आल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दाराची कडी तोडून दरवाजा उघडलर तेंव्हा नकुशाने आत्महत्या केल्याचे दिसून आले.
दोन सुसाईड नोटमध्ये काय?
घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना दोन चिठ्ठ्या सापडल्या आहेत. यामध्ये निळया आणि लाल शाईने लिहिलेला मजकूर लिहीला आहे. यामध्ये तरुणाने त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. "एका तरुणामुळे मी जीव देत आहे. बोंद्रेनगरात राहायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. सापडशील तिथे मारणार, अशी धमकी त्याने दिली होती. तो मला सुखाने जगू देणार नाही. त्याच्यामुळेच मी जीव देत आहे. सॉरी आई, नाना. त्याला माफ करु नका," असे चिठ्ठीत लिहिले आहे.
तसेच लाल रंगाच्या शाईने लिहिलेल्या चिठ्ठीत तिने ‘त्रास देणाऱ्याचे नाव लिहून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे. "माझा जीव फक्त त्याच्यामुळेच रडत रडत गेलाय. त्याला शिक्षा द्या. तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल," असे म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.