आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:आरक्षणप्रश्नी कोल्हापूर केंद्रस्थानी; आंदोलने, बैठका सुरू

कोल्हापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यभर एकच भूमिका राहावी, अशी चर्चा या बैठकीत झाली

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात थेट रद्द केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येत आहेत. कोल्हापुरातही बैठका, आंदोलनाला सुरुवात झाली.

मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा मोर्चा समन्वयकांची कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराजांसोबत बैठक पार पडली. बैठकीत मराठा आरक्षणासाठी लढ्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी राज्याचे केंद्रस्थान कोल्हापूर व्हावे ही सकल मराठा समाजाची भूमिका आहे. शाहू महाराजांनी नेतृत्व करावे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

सकल मराठा समाज आचारसंहिता बनवणार. आरक्षण मिळविण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकार सोबत चर्चा करावी. राजकीय व्यक्तीने कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावे. नेतृत्व सकल मराठा समाजाकडे राहील. कोणत्याही मराठा व्यक्तीने आत्महत्येचा मार्ग निवडण्यापासून दूर राहावे, राज्यभर एकच भूमिका राहावी, अशी चर्चा या बैठकीत झाली.

राज्य शासनाकडे समाजाच्या मागण्या....
१- त्रुटी दूर करून घटनात्मक टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा प्रक्रिया सुरू करावी.
२- सारथी संस्थेचा विस्तार करावा, प्रतिवर्षी २००० कोटी द्यावेत. सक्षम अधिकारी नेमावेत.
३- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाची मर्यादा वाढवावी, जाचक अटी दूर कराव्यात. ५ हजार कोटींची तरतूद करावी.
४- मराठा समाजातील विद्यार्थी फी ओबीसी समाजाप्रमाणे आकारावी.
५- स्पर्धा परीक्षेतून भरती उमेदवारांना पदे द्यावीत. या आणि इतर मागण्या राज्य सरकारकडे या वेळी करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...