आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:कोल्हापूरचे जवान आसाममध्ये शहीद; आज होणार अंत्यसंस्कार

कोल्हापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील करंजगाव (ता. चंदगड) येथील जवान नितेश महादेव मुळीक (२५) हे अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. ही घटना बुधवार (दि. ९) रोजी सायंकाळी ६ वाजता आसाम येथे घडली. लष्कर सेवेतील अधिकाऱ्यांनी याची माहिती त्यांचे वडील महादेव मुळीक यांना कळवली. मुळीक यांच्या निधनाची बातमी समजताच करंजगावसह चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली.

नितेश मुळीक यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी चार वाजता करंजगावात आणले जाणार आहे. करंजगाव येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुळीक हे आसाम सीमेवर सेवा बजावत होते. सीमेपलीकडून अतिरेक्यांनी जोरदार गोळीबार केला.

यामध्ये नितेश शहीद झाले. नितेश आठ वर्षांपूर्वी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात आईवडील, काका, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...