आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, मी चांगला मुलगा आणि बाप होऊ शकत नाही, असे म्हणत कोल्हापुरात एका तरुण डॉक्टरने आपल्याच रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये खळबळ उडाली आहे. महेश रामचंद्र तेलवेकर (वय 40 वर्षे) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
सुसाईड नोटमध्ये काय?
महेश तेलवेकर यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मी चांगला बाप होऊ शकलो नाही. माझ्या आत्महत्येस कुणाला जबाबदार धरू नये, असे लिहले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचाही सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे.
कुुटुंब मुळ चिखलीचे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश तेलवेकर यांचे कुटुंब हे मूळचे नाणीबाई चिखली (ता. कागल) या गावचे आहेत. त्यांनी कागलमध्ये काही काळ आपला दावाखाना चालवला तर त्यानंतर मुरगुडमध्ये बाजारपेठेत 'ओम क्लिनिक' नावाने दवाखाना सुरु केला होता.
आर्थिक विवंचनेतून उचलेले पाऊल?
महेश तेलवेकर हे गेले काही दिवस आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती समोर आली आहे. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. रविवारी 12 मार्च रोजी दुपारी दावाखाना असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी शिवाजी कुंभार यांनी मुरगूड पोलिसात फिर्याद दिली.
कोल्हापुरात आत्महत्येचे सत्र थांबेना
कोल्हापुरात गेल्या काही दिवसात अनेक जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यात 20 ते 30 वयोगटातील तरुणांचा आकडा मोठा असल्याने पोलिसांकडून आत्महत्या करु नये यासाठी प्रबोधन सुरू करण्यात आले आहे. यातच जानेवारी महिन्यात कोल्हापुरात जवळपास 75 जणांनी आत्महत्या केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.