आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापुरात पुन्हा लॉकडाउन:आजपासून कोल्हापूर सात दिवसांसाठी बंद, लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद

कोल्हापूर24 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून कडकडीत लॉकडाऊन सुरू झाला. पुढील सात दिवसांपर्यंत हा लॉकडाउन राहणाह आहे. तर 2 आठवड्यांसाठी जिल्हाबंदी राहणार आहे. लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलिस प्रशासन ही सर्वत्र कार्यरत आहे. प्रशासकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता एक ही नागरिक घराबाहेर दिसत नाहीये. या 7 दिवसांत औषध आणि दूध पुरवठा यांनाच सवलत दिली जाईल. इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.

कोल्हापूर शहरात चौकाचौकात पोलिस तैनात आहेत. पोलिस प्रशासन प्रत्येक वाहनधारकाची कसून चौकशी केल्याशिवाय पुढे सोडले जात नाही. प्रशासनाने प्रत्येक चौक सील केला असून नागरिकांना बाहेर न पडण्याची कळकळीची विनंती केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी या लॉकडाउनची घोषणा केली होती. सोबतच या लॉकडाउनला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा अशी विनंतीही केली होती. आज या लॉकडाउनला सुरूवात झाली. नागरिकांनी प्रशासनाची विनंती मानत लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसत आहे. 

0