आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात कडक लॉकडाऊन:जिल्ह्यात 15 ते 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा प्रशासनाचा निर्णय

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • दूध, भाजीपाला व गॅस वितरण सुरू राहणार आहे. किराणा मालाची दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत

कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. 15 ते 23 मे या कालावधीत फक्त दूध, भाजीपाला व गॅस वितरण सुरू राहणार आहे. किराणा मालाची दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. 15 मे रात्री 12.00 वा. ते दि. 23 मे रात्री 12.00 वा. पर्यंत जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग, व्यापारी आस्थापना, कार्यालये, इतर आस्थापना व सेवा पुरविणारे घटक बंद ठेवण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनमध्ये हे सुरु राहणार​​​​​​​

 • जीवनावश्यक वस्तू फक्त दुध, भाजीपाला व गॅस घर पोच विक्री (सकाळी 6 ते 10 व दुपारी 4 ते सायं. 7), दूध संकलन, वाहतूक व वितरण व्यवस्था.
 • सर्व वैद्यकीय सुविधा, औषध दुकाने व वैद्यकीय सुविधेसाठी आवश्यक सर्व उत्पादन, विक्री, वाहतूक व वितरण व्यवस्था. तसेच सर्व प्रकारची औषध निर्मिती करणारे उद्योग व त्यासाठी कच्चा माल पुरवठा करणारे उद्योग व यांची वितरण संबंधी नियोजन करणारी कार्यालये
 • ऑक्सीजन उत्पादन व पुरवठा करणारे उद्योग व त्यांना कच्चा माल पुरवठा करणारे उद्योग तसेच त्यांची वितरण व्यवस्था
 • शेतीशी निगडीत कामे व मान्सून पूर्व कामे
 • इंधन व पेट्रोलियम पदार्थ विक्री, वाहतूक व वितरण व्यवस्था. फक्त अत्यावश्यक सेवेमधील वाहनांसाठी.
 • कायदा व सुव्यवस्था व अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, आरोग्य सेवेशी निगडीत सर्व आस्थापना व कार्यालये शासनाकडील निर्देशानुसार 15% उपस्थितीसह व न्यायालयीन कामकाज
 • एटीएम, पोस्ट कार्यालये
 • प्रसारमाध्यमे, वृत्तपत्र वितरण
 • इंटरनेट यंत्रणा, दुरध्वनी, मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या आस्थापना व कार्यालये.
 • सर्व प्रकारची माल वाहतुक
बातम्या आणखी आहेत...