आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:महालक्ष्मी भक्तांच्या दर्शनाची वेळ दोन तास वाढवली, आता रोज घेता येणार आठ तास दर्शन

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भक्तांसाठी मंदिर संस्थानकडून ई पास द्वारे दर्शन सुविधा

सात महिन्यांनी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर एक आठवड्यात ७० हजार भाविकांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. अनेकांना वेळेअभावी दर्शन घेता आले नाही. भक्तांची ही तळमळ पाहता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शनाची वेळ वाढविली आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत मिळणारे दर्शन आता सकाळी 7 ते 12 या वेळेत दर्शन मिळणार आहे. शिवाय सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुद्धा दर्शन मिळणार आहे. दर्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी दर्शनाची वेळ वाढवली असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

महालक्ष्मी दर्शन आता ई पास द्वारे....

पर्यटक भाविकांच्या सोयीसाठी आता ई पासद्वारे दर्शन घेण्याची व्यवस्था देवस्थान समितीने केली आहे. यासाठी देवस्थान समितीचे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर ई पास तयार होईल. ई पास असणाऱ्या भक्तांसाठी वेगळी रांग करण्यात येणार असून हि सुविधा संपूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser