आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:बॉम्बची अफवा; महालक्ष्मी मंदिरामध्ये एकच धावपळ, एक तास दर्शन बंद ठेवून मंदिरात तपासणी

कोल्हापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने गुरुवारी चार वाजता पोलिसांसह मंदिरातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर पोलिस मुख्यालयात फोन खणाणला आणि क्षणार्धात अंबाबाई मंदिर परिसरात पोलिस फौजफाटा वाढला. बाॅम्बशोध पथक, डाॅग स्क्वॉड आणि सगळी सुरक्षा यंत्रणा मंदिर परिसरात दाखल झाली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या निनावी दूरध्वनीने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडवली.

तपासणीअंती संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. सायंकाळी चार वाजता हे सर्व घडले. यादरम्यान दर्शनरांग थांबवून ठेवण्यात आली होती. तपासणी झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. निनावी दूरध्वनीमुळे पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. श्वानपथक तसेच बॉम्बशोध पथक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अंबाबाई मंदिरात संध्याकाळी सात वाजेपर्यंत ठाण मांडले होते. त्यानंतर सर्वांना सुटकेचा निश्वा:स सोडला.

बातम्या आणखी आहेत...