आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लगबग नवरात्रोत्सवाची:ऑनलाइन बुकिंगद्वारेच महालक्ष्मीचे दररोज 10 हजार भाविकांना दर्शन; वणी गडासह पंढरपूर, त्र्यंबकेश्वरमध्ये जय्यत तयारी

कोल्हापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे ऑनलाइन बुकिंगच्या पासेसद्वारे दररोज १० हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. एका तासात ७०० भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत भाविकांसाठी फिजिकल डिस्टन्सिंगसह पांढरे पट्टे मारण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिर स्वच्छता, विद्युत रोषणाई झाली आहे. मंडप उभारणी, दर्शन रांगेची सोय केली जात आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी दिली. नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी विविध समित्या सक्रिय असून त्यांच्या समन्वय बैठका सातत्याने सुरू असल्याचे नाईकवडे यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यामुळे मंदिरात होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षिततेचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगसह मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर व नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

ओटी-पूजा साहित्यावर बंदी
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही ओटी अथवा पूजेचे कोणत्याही प्रकारचे साहित्य सोबत नेता येणार नाही. त्याच पद्धतीने श्रीपूजकांनीही भाविकांकडून ओटी अथवा पूजेचे साहित्य मंदिरात नेऊ नये. मंदिरात जे देवीचे दैनंदिन धार्मिक विधी होतात, ते करावेत, अन्य अभिषेक करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

एका तासात सुमारे ७०० भाविकांना दर्शनासाठी साेडण्याचे नियोजन
- भाविकांना ऑनलाइन माध्यमातून www.saptshrungi.net /www.ssndtonlin.org या संकेतस्थळावर दर्शन पास उपलब्ध { ऑनलाइन दर्शन पास माध्यमातून प्रतितास १२०० भाविकांसाठी उपलब्ध असेल.
- भाविकांच्या ऑनलाइन पासवर निर्धारित वेळेच्या १ तास अगाेदर नांदुरी येथे पोलिस व महसूल प्रशासनामार्फत पासची तपासणी करण्यात येणार आहे.
- १० ते ६५ वय वर्षांमधील व्यक्तींना दर्शन घेता येणार आहे.
- भाविकांचे काेराेना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेले हवे, तसे सर्टिफिकेट जवळ असावे.
- ज्या भाविकांचे कोविड १९ चे दोन्ही डोस पूर्ण नसतील अशा भाविकांसाठी ७२ तासांतील आरटीपीसीआर तपासणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक
- ७ ते १५ व १९ ते २० ऑक्टोबरपर्यंत नांदुरी ते सप्तशंृग गड रस्ता जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये खासगी वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
- मास्क वापरणे बंधनकारक आहे. सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर वापरणे गरजेचे.
- ऑनलाइन पास व अन्य काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास प्रशांत दामरे यांच्याशी ९२२४३४६६०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पंढरपुरातही नियोजन सुरू
पंढरपूर | पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील तसेच परराज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने योग्य नियोजन करून राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची रेल्वेस्टेशन, बसस्थानक, वाहनतळ येथे तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्र्यंबकेश्वर मंदिर उघडण्याची पूर्वतयारी
त्र्यंबकेश्वर | महाराष्ट्रातील सर्व मंदिरे ७ ऑक्टोबरला उघडणार असल्याचे जाहीर झाल्याने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांना दर्शनाकरिता उघडण्यासाठी देवस्थान ट्रस्टद्वारे तयारी सुरू करण्यात आली आहे. येथील मंदिर बंद असल्याने स्थानिकांचे सर्व व्यवहार बंद होते. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी रहिवाशांना निर्माण झाल्या. त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ, ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी उगमस्थान, गोमुख, गंगाद्वार व निलांबिका देवी अशी धार्मिक व पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत.

सप्तशृंगी देवीचे प्रतितास १२०० भाविकांना दर्शन
वणी | ७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ हाेत आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यात्रेला परवानगी दिलेली नाही. केवळ भाविकांना सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी परवानगी विश्वस्त संस्थेने निर्धारित केलेल्या नियमानुसार देण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...