आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापेक्षा निर्दयी असूच शकत नाही:जन्मदात्या आईचा खून करून काळीज काढणाऱ्या नराधमास फाशी; दारुसाठी पैसे दिले नसल्याने होता रागात, 4 वर्षांच्या चिमुकलीमुळे क्रूरपणा उघडकीस

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दारूसाठी पैसे दिले नाहीत या रागाच्या भरात जन्मदात्या आईला ठार मारून तिचे काळीज काढणाऱ्या निर्दयी नराधमास गुरुवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सुनील कुचकोरवी असे आरोपीचे नाव आहे. ही घटना कोल्हापुरात कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहतीत २८ ऑगस्ट २०१७ रोजी घडली होती. यल्लव्वा रामा कुचकोरवी असे मृत वृद्धेचे नाव होते. हल्लेखोर मुलगा सुनीलला याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. जन्मदात्या आईला क्रूरपणे मारणाऱ्या कुचकोरवी खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

गावोगावी फुगे,कंगवे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या यल्लव्वा हिला दोन मुले. थोरला राजू तर धाकटा सुनील. दोघेही सेंट्रिंगचे कामे करतात. सुनीलला दारूचे प्रचंड व्यसन असल्याने त्या दिवशी दहाच्या सुमारास आई घरात आल्यावर सुनीलने तिच्याकडे पैशांची मागणी केली. यल्लवाने नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर घराबाहेर पडलेला सुनील एकच्या सुमारास नशेतच घरात आला. त्याने आईशी वाद घालत तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. दरम्यान, ही घटना कळताच पोलिसांनी नागिरकांच्या मदतीने हल्लेखोर सुनील याला ताब्यात घेतले, त्याचबरोबर चाकूही जप्त केला. याप्रकरणी १२ साक्षीदार तपासले. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयाने सुनील याला दोषी ठरवले. याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक यांनी मदत केली.

चार वर्षाच्या चिमुकलीमुळे उघडकीस : मुख्य रस्त्यापासून आत घडलेला हा प्रकार परिसरात कोणाच्या लक्षात आला नाही. दुपारी दीडच्या सुमारास गल्लीतील एका चार वर्षीय मुलीने यल्लव्वा यांच्या घरातून बाहेर येणारे रक्त पाहिले. घाबरलेल्या मुलीने याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर परिसरातील नागरिकांनी यल्लाव्वाच्या घरात पाहिले असता तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत दिसला. मृतदेहाच्या काळजाचे तुकडे एका भांड्यात ठेवले होते. चटणी आणि मिठाची बरणीही शेजारीच होती. मुलगा सुनील हा नशेत घरातच पडला होता.

बातम्या आणखी आहेत...