आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधात अडथळा ठरला पती:शिर धडावेगळे करत पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

कोल्हापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुनत्याचे अपहरण करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात पत्नी आणि तिच्या प्रियकरासह आठ जणांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. नितीन बाबासाहेब पडवळे (रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांचे जानेवारी 2011 मध्ये अपहरण करून खून करण्यात आला होता. यामध्ये पत्नीसह अन्य एका महिलेचाही समावेश आहे. तर अन्य दोन जण फरार आहेत.

दीड लाखांची सुपारी

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मृत नितीनची पत्नी लीना पडवळे आणि रवी माने यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, पती प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळे नितीनच्या खुनाचा कट रचण्यात आला. नितीनला संपवण्यासाठी दिलीपला दीड लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती.

असा रचला कट

त्यानुसार कट रचण्यात आला. 12 जानेवारी 2011 रोजी आर. के. नगर येथील खडीचा गणपती मंदिर या ठिकाणी नितीनला बोलावून मारहाण करण्यात आली. त्यानंतर अपहरण करून सर्वजण वाठार-बोरपाडळे मार्गे विशाळगड रोडवर मानोली गावच्या जंगलात वाघझरात नेण्यात आले. यानंतर आरोपींनी नितीनचे शिर धडावेगळे करून त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला.

या 8 जणांना जन्मठेप

या प्रकरणात नितीनच्या पत्नीसह 11 आरोपींनी नितीन बाबासाहेब पडवळे यांचे अपहरण करून खून केल्या प्रकरणा शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये रवी रमेश माने, दिलीप व्यंकटेश दुधाळे, मनेश सबण्णा कुचकोरवी, विजय रघुनाथ शिंदे, किशोर दोडाप्पा माने, आकाश ऊर्फ अक्षय सीताराम वाघमारे, लीना नितीन पडवळे आणि गीतांजली विरुपाक्ष मेनशी या आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...