आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताचे पहिले हिंदकेसरी मल्ल श्रीपती खंचनाळे (वय ८६) यांचे आज पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार घेत होते. खंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली. पैलवानांनी खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली.
खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील कोल्हापूरातील शाहुपुरी तालमीचे ते मल्ल होते. रंगाने उजळ, उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे एक उंचापुरा देखणा मल्ल अशीही जनमानसात त्यांची ख्याती होती.
गत महिनाभरापासून श्रीपती खंचनाळे हे गंभीर आजारामुळे तीन वर्षांपासून अंथरुणाशी खिळून होते. मात्र सध्या त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांच्यावर कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक स्वरूपातील मदतीसाठी त्यांचा मुलगा रोहित खंचनाळे यांनी आवाहनही केले होते.
खंचनाळे यांची कुस्तीमधील कामगिरी
पहिले हिंदकेसरी मल्ल असल्याने कुस्तीविश्वात त्यांना मान होता. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.