आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:मराठा आरक्षण लढ्याचे कोल्हापुरातून फूंकणार रणशिंग, खासदार संभाजीराजेंची कायदेतज्ज्ञ, तालीम संस्था प्रतिनिधींसोबत बैठक

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • सोमवारी खासदार संभाजीराजे हे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्यात येणार आहे. लढ्याचे राज्यस्तरीय रणशिंग कोल्हापूरात फुंकण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती लढ्याचे नेतृत्त्व करणार आहेत. सोमवारी खासदार संभाजीराजे हे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. या बैठकीनंतर संभाजीराजे राज्याच्या दौऱ्यासाठी रवाना होणारआहेत. यानंतर ते पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे सकल मराठा समाजाच्या पदाधिकान्यासोबत चर्चा करून पुढील दिशा दर्शविणार आहेत.

मराठा आरक्षण संदर्भात मागील सरकारने योग्य कायदा केला नाही. सध्याच्या सरकारनेही त्याची मांडणी भक्कमपणे केली नसल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला होता. तसेच यावर मार्ग काढण्यासाठी 27 मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्षनेत्यांना भेटून समाजाची बाजू मांडणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...