आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:उद्योगपती संजय घोडावत यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना सीआयडीकडून अटक

कोल्हापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका उद्योगपतींची अशाप्रकारे फसवणूक झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर येथील उद्योगपती संजय घोडावत यांची जागेच्या व्यवहारात करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शीतलकुमार मणेरे, ज्योती मणेरे यांना सीआयडी, बेंगलोर यांच्याकडून अटक करण्यात आली आहे. एका उद्योगपतींची अशाप्रकारे फसवणूक झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग जगतासह जयसिंगपूर इचलकरंजी सांगली भागात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत माहिती अशी: शीतलकुमार मणेरे, ज्योती शीतलकुमार मणेरे (रा.इचलकरंजी) व साथीदार रवींद्र परिसा माणगावे, सन्मती रवींद्र माणगावे (रा. सांगली) शीतल जिनेंद्र मगदूम, कृष्णमूर्ती रामलिंगम मुदलियार, अर्चना मुदलियार, किरण घारे, निलेश शामसुंदर साबळे, अपूर्वा निलेश साबळे, विवेक रामचंद्र धामणसे, महेश भूपतकुमार ओझा, मंगेश चव्हाण, शेख गुलाम हुसेन, जिग्नेश ओमप्रकाश व्यास, अभिषेक व्यास (रा. मुंबई) यांनी एकत्रित येऊन कट रचून जागेच्या व्यवहारात संजय घोडावत यांची करोडो रुपयांची फसवणूक केली होती याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. हा तपास बेंगलोर सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

तपासा दरम्यान मणेरे यांच्या घरी धाड टाकून सीआयडीने मुद्देमाल ताब्यात घेतला होता. वर नमूद केलेल्या सर्व व्यक्तींनी जागेचा व्यवहार व बांधकाम यासंबंधी घोडावत यांची दिशाभूल करून संगनमताने करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणुकीत वर नमूद केलेल्या सर्वांचा सहभाग असल्याने सीआयडी, बेंगलोरचे डीवायएसपी कोंदडमराम हे गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...