आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवर कोरोना चाचणी, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला नवा नियम

कोल्हापूर20 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असला तरी अनेक ठिकाणचा पोलिस बंदोबस्त हटवण्यात आला आहे.

कोल्हापूरात विनाकारण फिरणाऱ्यांची आता जागेवरच कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. ज्या ठिकाणी पोलिस तपासणी नाके आहेत त्या सर्वच ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दरदिवशी कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. असे असूनही शहर आणि जिल्ह्यातील गर्दी कमी होताना दिसत नाही. सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तू तसेच भाजी विक्री व प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, दिवसभर संचारबंदी लागू असूनही अनेकजण विनाकारण फिरताना दिसतात.

जिल्ह्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असला तरी अनेक ठिकाणचा पोलिस बंदोबस्त हटवण्यात आला आहे. यामुळे दिवसभर शहरात अनेक ठिकाणी गर्दी दिसते. या सर्व पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांना दंड करण्याऐवजी त्यांची थेट कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागात गल्लीबोळात तसेच सार्वजनिक मंडळाच्या कार्यालयात, मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. अशांनाही आता चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. याकरता मोबाईल व्हॅन फिरणार असून असे गर्दी केलेल्या ठिकाणी लोकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...