आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर पोलिसांची धाडसी कारवाई:मोस्ट वाँटेड गुन्हेगार आप्पा मानेला पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना यश, कुख्यात गुन्हेगारांवर 20 गंभीर गुन्हे

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांवर गोळीबार करून कोठडीतून झाले होते पसार
  • पुणे - बेंगळुरू महामार्गावर शाहू टोलनाक्यावर सापळा रचून अटक

पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथील सुमारे २० गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला ट्रिपल मोका कारवाईतील कुख्यात फरारी गुन्हेगार आप्पा उर्फ सुभाष ज्ञानदेव माने (वय ३२ रा. तामशेतवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याचा फरार साथीदार पप्पु उर्फ सुहास किसन सोनवलकर (३० रा. वडले, ता. फलटण, जि. सातारा) यालाही अटक केली.

पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या दोन अट्टल गुन्हेगारांनी पोलिसांवर दोनदा गोळीबार केला होता. तसेच पोलिस कोठडीतून पसार झाले होते. पुण्यात ज्वेलर्सवर दरोडा टाकताना पोलिसांवर गोळीबार केला होता. दोघा संशयितांच्याकडे कमरेला राऊंडसह लोड असलेले दोन पिस्टल, २० जिवंत राऊंड आदी शस्त्रसाठा जप्त केला. आरोपींच्यावर विविध पोलिसांत दरोडा, रॉबरी, खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बुधवारी सायंकाळी शिवाजी विद्यापीठ, शाहु टोल नाका परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने तसेच राखील पोलिस दलाच्या मदतीने ही नियोजनबद्द कारवाई केली, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास व राखीव पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास व राखीव पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पथकाला ३५ हजार रुपयेचे बक्षीस जाहीर केले.

आरोपी आप्पा उर्फ सुभाष माने हा दरोडा, जबरी चोरी, खंडणी अशा अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. त्याच्यावर तीन गुन्ह्यांत मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात सोन्याचे दुकान लुटताना या टोळीने पोलिसांचा पोषाख घातला होता. तेव्हा पोलिसांवर त्यांनी गोळीबारही केला. त्यानंतर फलटण येथेही पोलिसांवर या आरोपींनी गोळीबार केला होता. एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर माळशिरस येथून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळून गेला होता, असे त्यांनी सांगितले. संशयितांनी बेळगाव (कर्नाटक)नजीक एका ज्वेलरी दुकानावर दरोड्याबाबत त्यांनी रेकी केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...