आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:कोल्हापूरात पुरस्थिती गंभीर, नागरिकांचे स्थलांतर सुरू; एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणच्या स्थितीत
  • राधानगरी धरणाचे 3 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह इतर नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. कोल्हापूर शहराला धोक्याचा इशारा देणारा रेडेडोह फुटला आहे. परिणामी चिखली, आंबेवाडी, केर्ली या गावांसह कोल्हापूर शहरातील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. खबरदारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.

गुरुवारी सकाळपासून शहर व परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण ९९ टक्के भरल्याने 3 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात 243 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

एनडीआरएफची दोन पथके

पथक प्रमुख शिवप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक पथक 22 जवान व 2 बोटीसह शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे सकाळी रवाना झाले. मनोजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील 22 जवान व 2 बोटीसह कोल्हापूर शहरात तैनात आहे. आपत्तीमध्ये काम करण्यासाठी एनडीआरएफचे पथक सक्षम असल्याचे श्री. शर्मा यांनी सांगितले.

9 राज्य मार्गासह जिल्ह्यातील 34 मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

आज सकाळी 9 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग व 25 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 34 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...