आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:आज कोल्हापुरातून रणशिंग; औरंगाबाद, नाशिक, अमरावती, रायगडातही अांदोलन

कोल्हापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूरसह महाराष्ट्रातील जिल्ह्यामधूनही या आंदोलनाची मशाल धगधगणार आहे.

मराठा समाजाला अारक्षण मिळावे यासाठी बुधवारी कोल्हापुरातून अांदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार अाहे. खासदार संभाजी शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक अांदोलन करण्यात येणार असून राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळी काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात येणार अाहे. कोल्हापूरसह औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि रायगड अशा राज्यातील पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार अाहे. या आंदोलनात वंचित बहुजन अाघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हेसुद्धा सहभागी होणार अाहेत. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधी बोलतील, आम्ही ऐकू, असे संभाजीराजे यांनी मंगळवारी सांगितले.

आंदोलनासाठी मंत्री, खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात अाले आहे. मूक आंदोलनानंतर मुंबईत विधान भवनावर लाँग मार्च काढण्यात येणार अाहे. त्यासाठी जिल्हावार बैठका घेण्यात येणार अाहेत. लाँग मार्चबाबत बुधवारी चर्चा व घोषणाही होण्याची शक्यता आहे.मंगळवारी आंदोलनाच्या तयारीसाठी संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने अाचारसंहिताही जाहीर करण्यात अाली. या आंदोलनास कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह अामदार-खासदारांनी पाठिंबा दिला अाहे.

आंदोलनासाठी आचारसंहिता

  • काळ्या रंगाची वेशभूषा, दंडावर काळी फीत अन् काळा मास्क अनिवार्य
  • पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री, सोबत सॅनिटायझर अावश्यक.
  • आंदोलनस्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन न करणे.
  • कोरोनाचे नियम कसोशीने पाळणे.
  • संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन
बातम्या आणखी आहेत...