आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:कोल्हापूर बनू लागलेय 'गॅंगस्टर्स हब'? उपनगरे बनली परप्रांतीयांची आश्रयस्थाने

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूर... शाहु नगरी, कुस्ती पंढरी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. पूर्वीपासून हे एकमेव असे ठिकाण होते जिथे परप्रांतीयांना सन्मानाने राजाश्रय मिळाला होता. त्याचमुळे कुस्तीगीर, बंगाली कारागिर, राजस्थानी व्यापारी, उत्तर भारतीय कामगार असे अनेक लोक सहकुटुंब कोल्हापूर जिल्ह्यात स्थित झाले आहेत. पण नुकतीच राजस्थान पोलिसांनी कोल्हापूरात सापळा रचून हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मोस्ट वाॅंटेड गुन्हेगार पपला गुर्जर याला पकडले. पपला गुर्जर वर कारवाई झाली त्याच दिवशी वाघोला गुजराथ येथील दरोडेखोर प्रवीण धीराजी याला मुंबई पोलिसांनी कोल्हापूरातून अटक केली. यापूर्वीही पंजाब, हरियाणासह इतर राज्यातील पोलीसांनी तेथे अनेक गुन्हे करुन फराल झालेल्या खतरनाक गुन्हेगारांना कोल्हापूरात अटक केली आहे. त्यामुळे कोल्हापूरची वाटचाल हळुहळु गॅगस्टर हब अशी होऊ लागली आहे. मात्र शाहूनगरी कोल्हापूरसाठी ही धोकादायक आहे.

पपला गुर्जर गेले दहा महिने सरनोबतवाडीत रहात होता. बनावट निवडणूक ओळखपत्र दाखवून तो याठिकाणी तळ ठोकून होता. बुधवारी मध्यरात्री सरनोबत वाडी येथील उजळाई काॅलनीत शंभरहून अधिक पोलिस फौजफाटा दाखल झाला. काॅलनीतील अन्य घरांना पोलिसांनी बाहेरुन कड्या घातल्या आणि पपला गुर्जर राहणार्या इमारतीला घेरले. त्यातूनही धूम ठोकण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुर्जरला बेड्या ठोकल्या.

शहरानजीक सरनोबतवाडी परिसरात ही कारवाई झाली. घटनेनंतर मात्र सरनोबतवाडी परिसरात घबराट पसरली आहे. कोणी याविषयी बोलायला तयार नाही. मुंबईत चोरी करून कोल्हापूरात लपून बसलेल्या प्रविण धीराजीलाही उपनगरातून पकडण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक उद्योग धंदे आहेत कारखाने आहेत ज्याठिकाणी परप्रांतीय कामगार काम करतात. याशिवाय गुजरीत दागिन्यांवर कलाकुसर करण्यासाठी अनेक बंगाली कारागिर, राजस्थानी कारागिर काम करतात. ते सगळे कोल्हापूर शहरानजीक भागात राहतात. पपला गुर्जर सारख्या कुख्यात गुंडाला कोल्हापूरात सहजासहजी आश्रय यामुळेच मिळाला. पण आता मात्र नागरिकांत भिती पसरली असून उपनगरात भाडेकरू बनून राहिलेल्या प्रत्येकाची कसून चौकशी सुरू झाली आहे.

पोलिस प्रशासनाने उभारलेली परप्रांतीय चौकशी मोहीम कागदावरच....

काही वर्षांपूर्वी गुजरी परिसरात येणाऱ्या व्यापार्यांना लुटण्याचे प्रकार घडले होते. यामध्ये परप्रांतीय कामगार गुन्हेगार असल्याचे समोर आले होते. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूरात कामासाठी राहणार्या परप्रांतीय कामगारांची चौकशी सुरू केली होती. यामध्ये परप्रांतीय कामगारांना ओळख पटवण्यासाठी पुरावे सादर करावे लागत होते. तसेच घरमालकांनीही आवश्यक बाबी कागदपत्रे तपासून भाडेकरू ठेवावेत असे सांगितले होते. पण पुन्हा ही मोहीम थंडावली. त्याचमुळे उपनगरात अशा गुन्हेगारांना सहज आश्रय मिळू लागला आहे. कुस्ती पंढरी असल्याने अनेक परप्रांतीय कोल्हापूरात वास्तव्यास आहेत. दरवर्षी त्यात भर पडत आहे. कोल्हापूर शहरातील काही ठिकाने तर परप्रांतीय पैलवानांची वस्ती म्हणून ओळखली जात आहेत. त्यांची ओळख पटवणे आवश्यक आहे. कोल्हापूर पोलिस दलासमोर हे आव्हान आहे.

बातम्या आणखी आहेत...