आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:उपचारांचा खर्च परवडत नसल्याने निर्दयी बापाने पोटच्या मुलाला फेकले पंचगंगेत

कोल्हापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोल्हापुरातील दोन महिन्यांतील तिसरी घटना

औषधोपचारांचा खर्च परवडत नसल्याने कबनूर (तालुका हातकणंगले) येथील निर्दयी बापाने पाच वर्षीय मुलाला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापाने या कृत्याची पोलिसांसमोर कबुली दिली आहे. कौटुंबिक कारणास्तव मुलांना नदीत फेकल्याची गेल्या दोन महिन्यांतील परिसरातील ही तिसरी घटना आहे.

अफांन सिकंदर मुल्ला (५, रा. पंचगंगा साखर कारखाना रोड, कबनूर) असे मृत मुलाचे नाव आहे. बाप सिकंदर हुसेन मुल्ला (४८) यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. घटनेमुळे मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.कबनूर येथे राहणारा सिकंदर मजुरी करतो. तोही अपंगही आहे. काही महिन्यांपासून त्याच्या कुटुंबात वाद आहे. त्यातच दारूच्या नशेत तो अनेक वेळा घराबाहेरच असतो. त्याला दहा वर्षांची मुलगी व अफान अशी दोन मुले आहेत. अफान याला फिटचा आजार आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराच्या खर्चाच्या कारणावरूनही कुटुंबात सतत वाद व्हायचे. शुक्रवारी त्याने उपचारासाठी नेतो असे सांगत अफानला नदीत फेकून दिले. त्यानंतर घरी येऊन ही माहिती िदली. रात्री उशिरापर्यंत अफान याचा शोध सुरू होता.

बातम्या आणखी आहेत...