आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरच दिला बाळाला जन्म:खुरप्याने कापली नाळ; कोल्हापूर जिल्ह्यातल्या खड्ड्यांमुळे उसतोड कामगार महिलेचे अतोनात हाल

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उसतोडीसाठी मध्यप्रदेशवरुन आलेल्या एका महिलेला खड्ड्यांमुळे रस्त्यातच बाळाला जन्म द्याला लागला. ही वेदनादायक घटना निपाणी-मुरगूड रोडवरील यमगे गावामध्ये घडली. सुविधा नसल्याने यावेळी बाळाची नाळ खुरप्याने कापण्यात आली. उसतोडीसाठी आलेल्या महिलांना नेहमीच अशाप्रकारचे त्रास सहन करावे लागतात. प्रगत महाराष्ट्रातील ही अशाप्रकारची पहिलीच घटना नव्हे.

हाताला काम नसल्याने मध्य प्रदेशातून ऊस तोडणीसाठी एक कुटुंब कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथे आले. कुटुंबातील महिला किरण केसू पालवी (रा. खारी, ता. खालवा, जिल्हा खांडवा, मध्य प्रदेश) देखील मजूरी करत असे. दरम्यान महिला गर्भवती राहिली. तरीदेखील तिचे मेहनतीचे काम सुरुच होते. कामाच्या शोधात आल्याने काम न करुन या महिलेला चालणार नव्हते.

उसतोड महिलांचा प्रश्न

अशातच काही महिने सरले. आणि एक दिवस काम करत असताना या महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या. तिला रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र प्रवासादरम्यान खराब रस्त्यामुळे तिच्या प्रसुती कळांमध्ये वाढ झाली. आणि तिने रस्त्यातच बाळाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतिणीला यानंतर मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा खराब रस्त्याचा आणि उसतोड महिलांचा प्रश्न समाजासमोर उभा राहिला आहे.

नेमके काय झाले?

रयत साखर कारखान्यात काम करणारे हे कुटुंब कासेगावात वास्तव्यास आहे. आपल्या पत्नीला कळा सुरु झाल्याने ते सायंकाळी तिरवडेच्या (ता. भुदरगड) दिशेने निघाले होते. यमगेजवळ आल्यानंतर गर्भवती महिलेच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. खराब रस्त्यामुळे तिच्या प्रसुती कळा वाढू लागल्या.

अखेर सुटका झाली

गंभीर झालेली परिस्थिती पाहता रस्त्याच्याकडेला शेतामध्ये महिलांनी आडोसा निर्माण केला. आणि महिलेने आपल्या बाळाला जन्म दिला. वेदनांमधून तिची अखेर सुटका झाली. बाळाची नाळ देखील कापण्यासाठी सुविधा नसल्याने ती खुरप्याने कापण्यात आली. यावेळी प्रचंड रक्तस्त्रावही झाला.

बातम्या आणखी आहेत...