आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाला चीतपट:कोल्हापूरच्या पैलवानांची कोरोनाला धोबीपछाड; ग्रामस्थांनीही शड्डू ठोकले

मनोज व्हटकर, मंगेश फल्ले | कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खुराक, व्यायामाने राखले आरोग्य, पण कुस्तीबंदीमुळे नुकसान

मराठी माती म्हणजे कोल्हापुरी कुस्ती हे नातं सर्वदूर पोहोचलेलं. राशिवडेच्या या पैलवानांनी कोरोनाच्या लढाईतही मजबूत खुराक आणि तेवढीच मजबूत तालीम याच्या जोरावर कोरोनाच्या जीवघेण्या हल्ल्याचा सामना केला आहे. दहा हजार लोकसंख्येच्या राशिवडे गावात तब्बल साडेचारशे पैलवान आहेत आणि त्यात दहा मुलीसुद्धा. प्रश्न आहे तो लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे कुस्त्या "लॉक' झाल्याने प्रत्येक पैलवानाच्या लाखो रुपयांच्या नुकसानीचा.

कोल्हापूर शहरापासून २५ किलोमीटर अंतरावरील हे राशिवडे गाव. कोरोनानं सारं जग थबकलं, पण पैलवानांना त्यांचा खुराक सुरूच ठेवावा लागला. एकेका पैलवानाचा वर्षाचा खुराकावरचा खर्च लाखाच्या घरात जाणारा. कुस्त्या बंद असल्यानं हे लाखो रुपये पाण्यात गेले, पण यातील पोषणामुळे कोरोनाला दूर ठेवण्यात त्यांना यश आलंय.

प्राणायाम आणि मेडिटेशनचा आधार : कोरोनामुळे कुस्त्यांच्या स्पर्धा बंद झाल्या आहेत. वर्षभरामध्ये विविध स्पर्धांमधून एका पैलवानाला किमान लाख रुपये कमावता येतात. पण सध्या ते उत्पन्न बंद झाले आहे. त्यातच प्रत्यक्ष कुस्ती खेळता येत नसल्यामुळे मानसिक तणाव आहे. त्यावर उपाय म्हणून वस्ताद दीपक देवळकर यांनी काही ऑडिओ क्लिप पाठवून, प्राणायाम मेडिटेशन करण्याचा सल्ला देऊन त्यांचे मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

स्पर्धा बंद झाल्या आहेत. वर्षभरामध्ये विविध स्पर्धांमधून एका पैलवानाला किमान लाख रुपये कमावता येतात. पण सध्या ते उत्पन्न बंद झाले आहे. त्यातच प्रत्यक्ष कुस्ती खेळता येत नसल्यामुळे मानसिक तणाव आहे. त्यावर उपाय म्हणून वस्ताद दीपक देवळकर यांनी काही ऑडिओ क्लिप पाठवून, प्राणायाम मेडिटेशन करण्याचा सल्ला देऊन त्यांचे मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

आखाडे बंद, पैलवान चिंतेत
या गावांमध्ये दोन क्रीडा संस्था तालमी चालवतात. तेथे पैलवान घडविले जातात. या तालमीत कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव, उस्मानाबाद. सातारा या भागातून तरुण मुले कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. जवळपास दोन तालमीत २०० मुले प्रशिक्षण घेत आहेत. १० मुली आहेत. पहिल्या लॉकडाऊनमध्ये आठ महिने आणि आता या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारीपासून हे आखाडे बंद करण्यात आले आहेत. त्याची चिंता त्यांना सतावतेय.

दहा हजारांत पॉझिटिव्ह फक्त १६
पैलवानांचे गाव अशी ओळख असलेल्या या गावात सहा हजार जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे केवळ सोळा रूग्ण आहेत. त्यातून १० बरे होऊन घरी परतले. फक्त सहा बाधित रूग्णालयात उपचार घेत आहेत. दीडशे व्यापारी गावात आहे त्या सर्वांनी लस घेऊन स्वतःला सुरक्षित केले आहे. गावातील लोक जागरूक झाले असल्याने लसीकरणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पण तरूणांना अजून लस मिळालेली नाही. ४५ च्या पुढील नागरिकांचे ८५% टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात या गावाला कमालीचे यश मिळाल्याचे दिसून आले.

तपासण्यांवर भर : दर आठवड्यातून तीन दिवस आरोग्य पथकाकडून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. तीन दिवसांत सत्तर ते ऐंशी जणांना तपासले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...