आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फेब्रुवारी महिन्यात प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला व्हॅलेंटाईन डे ची प्रतिक्षा असते. म्हणूनच आजकाल व्हॅलेंटाईन वीक साजरा होतो. मग त्यात प्रॉमिस डे, चॉकलेट डे असे डे साजरे होतात. याच दिवसात 'काश रोज़ डे, प्रपोज़ डे चॉकलेट डे की तरह कोई रोटी डे भी होता..तो कोई बच्चा भूखा न सोता...' असा संदेश व्हायरल होतो. केवळ संदेश पुढे पाठवण्यापेक्षा रोटी डे साजरा करु असा विचार करून कोल्हापूर यूथ मुव्हमेंटसच्या वतीने रोटी डे साजरा करण्यात आला.
माणुसकी व आपुलकीच्या उद्देशाने 'एक घास..भुकेलेल्यांसाठी! या ब्रीदवाक्यासह हा उपक्रम फेब्रुवारीच्या तिसऱ्या रविवारी (दि. २१) शहरातील बिंदू चौकात कोल्हापुरातील युवकांनी भुकेलेल्यासाठी प्रेमाचा दिवस म्हणून 'रोटी डे' म्हणून साजरा केला. यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून रोटी डे साठी जमा झालेले शिजवलेले अन्न फिरस्ते, गरजूंना वाटप करण्यात आले.
कोल्हापूर यूथ मुव्हमेंटसच्या वतीने मागील दोन वर्षांपासून 'रोटी डे' साजरा करण्यात येतो. यंदाचा हे तिसरे वर्ष असून रोटी डेसाठी बिंदू चौकात भाकरी, चपाती, भाजी, भात यांपैकी शिजविलेले अन्नपदार्थ या संस्थेकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद लाभला दिवसभर जमा केलेले शिजविलेले अन्नपदार्थ सायंकाळी कार्यकर्त्यांनी बिंदू चौकासह दसरा चौक, शेंडा पार्कमधील कुष्ठपीडित शाळा, रेल्वे स्टेशन, टेंबलाई मंदिराचा परिसर, तावडे हॉटेल परिसर आदी भागांतील फिरस्ते व गरजूंना वाटप केले.या शिवाय जमा झालेले धान्य येत्या चार दिवसांत विनाअनुदानित आश्रमशाळा, एड्स ग्रस्त विद्यार्थीशाळा आदी ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाची प्रसार न होण्यासाठी योग्य खबरदारी घेतली आहे. मदत स्वरूपात येणार्या धान्याच्या पिशव्यांवर सॅनिटायझर वारले जात आहे. तसेच फिरस्त्याना मास्क वाटप, सॅनिटायझर जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.