आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूरच्या लेकींनी जगभरात विविध क्षेत्रांत आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे ‘ वुमेन आंत्रप्रेन्योर इंडिया’ या मासिकाने युरोपमधील इंडियन वुमन लीडर्स इन इंडियाची यादी जाहीर केली आहे. या यादीत मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या दोन महिलांचा समावेश केला आहे. लीना नायर आणि मनाली जगताप या कोल्हापूरच्या लेकींनी पुन्हा देशाचे आणि कोल्हापूरचे नाव उंचावले आहे.
शनेल या फॅशन ब्रँडच्या सीईओ लीना नायर आणि कासुमोच्या कंट्री मॅनेजर मनाली जगताप यांचा या यादीत समावेश आहे. मनाली जगताप यांनी काही दिवसांपूर्वी नव्या कंपनीत जबाबदारी स्वीकारली असून सध्या त्या योलो या कंपनीसाठी कंट्री मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. लीना नायर यांनी शनेल फॅशन ब्रँडची जबाबदारी स्वीकारली असून यापूर्वी त्या युनिलिव्हरमध्ये कार्यरत होत्या. तर मनाली जगताप यांनी काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये गांधी थाळी सुरू केली होती. महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या खाद्यपद्धतींवर आधारित या गांधी थाळीने जगाचे लक्ष वेधले होते.
दाेघीही हाेलीक्राॅसच्या विद्यार्थिनी लीना नायर आणि मनाली जगताप या दोघींचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले आहे. मनाली जगताप यांनी लिंक्डइनवर या संदर्भात माहिती दिली आहे. या यादीत लीन नायर यांचेही नाव आहे. भारतातून आलेल्या सर्वांत यशस्वी बिझनेस लीडरमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. लीना या शाळेतील माझ्या सीनियर आहेत, शिवाय लहानपणी आम्ही शेजारीही होतो. हा सन्मान मी नम्रपणाने स्वीकारते, अशी पोस्ट मनाली जगताप यांनी लिंक्डइनवर शेअर केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.