आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:कोरोनामुळे कोल्हापूरचा ऐतिहासीक शाही दसरा रद्द

कोल्हापूर2 वर्षांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

शाही दसरा म्हणजे कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवातील एक महत्त्वाचा क्षण. नैसर्गिक आपत्ती कारणांमुळे यापूर्वी कधीच दसरा सोहळा रद्द करण्यात आलेला नाही. यंदा मात्र प्रथमच कोरोनामुळे कोल्हापूरातील शाही दसरा रद्द करण्यात आला आहे. यावर्षी साधेपणानेच हा सण साजरा करावा यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी यंदाचा शाही दसरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यात आतापर्यंत सार्वजनिक सण व समारंभ रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग, सीपीआरसह इतर शासकीय विभाग प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यंदाचा दसरा रद्द करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. दसरा चौकात होत असलेल्या शाही दसऱ्याला लाखो लोक उपस्थित राहून सोने लुटतात. यावर्षी मात्र सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार नाही.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षीचा शाही दसरा रद्द करण्यात आला आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या सूचनेनुसार दसरा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कळविले आहे.

बातम्या आणखी आहेत...