आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा:राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत कोल्हापूरचे छायाचित्र प्रथम

कोल्हापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘युनेस्को’च्या नवी दिल्ली येथील कार्यालयाच्या वतीने ८ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनानिमित्त राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील विविध छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. शैक्षणिक परिसर, शैक्षणिक परिसरातील बदल पूर्वी आणि नंतर, अपारंपरिक शैक्षणिक परिसर, अशा तीन विभागांत ही स्पर्धा होती.

यात पहिल्या गटात प्रथम आणि तृतीय गटात तृतीय असे दोन पुरस्कार व विशेष उत्तेजनार्थ एक असे तीन पुरस्कार अभिजित गुर्जर (कोल्हापूर, महाराष्ट्र) यांनी पटकावले आहेत. या सर्व पुरस्कारप्राप्त छायाचित्रांचे युनेस्कोच्या दिल्ली कार्यालयात प्रदर्शन आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय विशेषांकामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

ऊसतोड मजुरांची मुले प्रतिकूल परिस्थितीतही कशा पद्धतीने अभ्यास करतात, या अभिजीत यांच्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला असून, हे छायाचित्र २०१८ मध्ये कोल्हापुरात कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याच्या परिसरात टिपले आहे.

बातम्या आणखी आहेत...