आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराचे स्वप्न अपुरेच:कुटुंबीय मे महिन्यात पूर्ण करणार होते मुलाचे स्वप्न, पण त्याआधीच पाकच्या भ्याड हल्ल्यात आले वीरमरण

कोल्हापूर3 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या संग्राम पाटील यांना वीरमरण, स्वप्न राहिले अधुरे

ऐन दिवाळीमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्रांना वीरमरण आले होते. त्या दु:खातून सावरेपर्यंत पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखीन एका सुपुत्राला वीरमरण आले आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आल्याने पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा या गावचे संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. काबाडकष्ट करुन शिवाजी पाटील यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवले. संग्राम यांची लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते कष्ट करुन संग्राम यांनी आपले शरीर मजबूत केले.

मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. फेब्रुवारी महिन्यापासून ते घराकडे परतले नव्हते. फोनवरुनच घरातील सगळ्याची खुशाली ते जाणून घेत असत. रिटायर झाल्यानंतरची अनेक स्वप्न संग्राम यांनी पाहिली होती. त्या आधीच त्यांच्यावर पाकिस्तानच्या हल्ल्यात ते शहीद झाले. संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. संग्राम यांच्या मागे आई वडील, भाऊ-बहिण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

संग्राम यांचे घराचे स्वप्न अधुरे...

संग्राम पाटील यांचे घर
संग्राम पाटील यांचे घर

संग्राम पाटील मे महिन्यात सुट्टीवर येणार होते. दोन महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापुरात घर बांधायला सुरुवात केली होती. आपले एक छान घर असावे असे त्यांचे स्वप्न होते. मे महिन्यात घराचे काम पूर्ण करून त्यांना सरप्राइज देण्याच्या तयारीत असतानाच ही बातमी आल्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.