आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. परिसरातील नैसर्गिक सौंदर्य उपभोगण्यासाठी तसेच सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाल्याने हॉटेल, लॉजेस हाऊसफुल्ल झाले आहेत. पहाटेच्या वेळी तापमानात जास्त घट झाल्यामुळे वेण्णा लेक, लिंगमळा परिसरात गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळत आहेत. ३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. यामुळे व्यावसायिकांची उत्साह वाढला आहे.
कास रस्त्यावर बस उलटून १० जखमी
सातारा | मॉर्निग वाॅकला निघालेल्या नागरिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात मिनी बस उलटून झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले. हा अपघात कास रस्त्यावर पिसानी गावाजवळ शनिवारी घडला. इस्लामपूर येथून आठ तरुण बामणोली येथे पर्यटनासाठी सातारा येथे आले होते. इस्लामपूर येथून सातारा येथे पोहोचल्यानंतर ते काही वेळ सातारा येथे थांबले होते. पिसानी गावाजवळ वळणावर मॉर्निंग वॉकला चाललेल्या नागरिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली.
अलिबागजवळ 4 किमीपर्यंत वाहनांची रांग
रायगड | सलग आलेल्या सुट्यांची संधी साधून पर्यटकांनी अलिबाग येथील समुद्र किनाऱ्याकडे धाव घेतली आहे. अलिबागजवळ वाहनांची ४ किमीपर्यंत रांग लागली आहे. मुंबई आणि पुण्याहून अलिबाग आणि मुरूडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागल्याने या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, मुंबई- पुणे महामार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. दुसरीकडे धार्मिक स्थळीही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.