आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणाला कोरड:कोयना धरणाला कोरड, 15 टीएमसी पाणीच शिल्लक, मान्सून लांबल्याने शेती सिंचनासह वीज प्रकल्पही अडचणीत

सातारा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनचा पाऊस लांबल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना धरण कोरडे पडत चालले आहे. धरणात केवळ १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात उपलब्ध पाणीसाठ्यावरच पश्चिमेकडील वीजप्रकल्प, तर पूर्वेकडील शेती सिंचन चालू आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला असूनही शेती सिंचनासाठी साठा आरक्षित असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पातून कमी क्षमतेने वीजनिर्मिती करण्यात येत आहे. पश्चिमेकडील वीजप्रकल्पांसाठी अत्यल्प पाणीसाठा वापरला जात आहे. हे पाणीसाठा १० जुलैपर्यंतच पुरणार आहे. कोयनाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पण सध्या धरणात १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध अत्यल्प पाणीसाठ्यावर पूर्वेकडील सिंचन, तर पश्चिमेकडील वीज प्रकल्प कार्यान्वित आहेत. पूर्वेकडील शेती सिंचनासाठी धरणातून दोन हजार १०० क्युसेक, तर पश्चिमेकडील वीज प्रकल्पाला दररोज ०.२ टीएमसी पाणी सोडले आहे.

बातम्या आणखी आहेत...