आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मागणी:पर्यटन व्यावसायिकांना सरकारने पॅकेज द्यावे, ललित गांधी यांची आदित्य ठाकरेंकडे मागणी

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही - आदित्य ठाकरे

कोरोनामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित ट्रॅव्हल एजंट्स, हॉटेल्स, रिसॉर्ट््स, ट्रॅव्हल कंपन्या यांच्यासाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.

फिक्की महाराष्ट्र समितीद्वारे २७ सप्टेंबरच्या ‘जागतिक पर्यटन दिनांच्या’ पार्श्‍वभूमीवर पर्यटन क्षेत्र, पर्यटन व्यावसायिक यांच्याशी निगडित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी विशेष व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. सदर ऑनलाइन चर्चासत्राचे उद्घाटन राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती व पर्यटनस्थळांचे वैभव पर्यटनासाठी पोषक असल्याचे सांगून टप्प्याटप्प्याने पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राज्यातील रेस्टॉरंट्स लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. तसेच राज्यात अधिकाधिक पर्यटक येतील अशा योजना सरकारतर्फे राबवण्यात येतील, असे सांगून केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या चर्चासत्राचे प्रास्ताविक फिक्की-महाराष्ट्राच्या चेअरमन सुलज्जा फिरोदिया यांनी केले. महाराष्ट्र सरकार राज्याच्या पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण व दीर्घकालीन विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.