आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिरीट सोमय्या हे पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, याविषयी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला येऊ द्या, शांततेच्या मार्गाने त्यांना कोल्हापूर दौरा करू द्या, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. कोल्हापूर जिल्हा शांतताप्रिय जिल्हा आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी कोणतेही वादग्रस्त विधान करू नये, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
गत आठवड्यात किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव करून कराडमधूनच माघारी पाठवण्यात आले होते. यानंतर येत्या मंगळवारी किरीट सोमय्या कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची सोमय्या यांनी घोषणा केली होती. यामुळे आता पुन्हा एकदा जिल्ह्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही, असा इशारा मुश्रीफ समर्थकांनी दिला होता. पण आज स्वतः मुश्रीफ यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ द्या, अडवू नका, असे आवाहन केले.
महाविकास आघाडी अस्थिर करण्याचा डाव.... : मुश्रीफ म्हणाले, मी यापूर्वी त्यांना सांगितले होते की, कोल्हापूर जिल्ह्यात आमचे राजकीय, सामाजिक आणि सहकारातील काम बघा. तसेच भारतीय जनता पक्षाची इथे ग्राउंड लेव्हलला काय परिस्थिती आहे याचीही त्यांनी माहिती घ्यावी. आतापर्यंत दोन आरोप त्यांनी माझ्यावर केले. त्याचा खुलासा मी केला आहे. तरीही सांगतो, केंद्रीय तपास यंत्रणेने रेड केल्यावर त्यांना आम्ही योग्य उत्तरे दिली होती, आरोप करण्यापूर्वी त्यांनी साखर कारखानदारीविषयी माहिती घ्यायला हवी होती. चुकीची माहिती देणाऱ्यांकडून माहिती घेऊन, अशा प्रकारे आरोप करणे, बेताल वक्तव्य करणेे अयोग्य आहे. हा महाविकास आघाडी अस्थिर करण्याचा डाव आहे. मी आता मंत्रिमंडळात कोणता घोटाळा केला आणि तो उघड केला असता तर ठीक होते; पण दहा वर्षांपूर्वीचे विषय खोदून काढले जात आहेत. हे सगळे राज्यात भाजप सत्तेवर असतानाही काढता आले असते. मग का नाही काढले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.