आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात सकल जैन समाजाने मंगळवारी विराट मूकमोर्चा काढला. या मोर्चाने जैन समाजाने “आपण सगळे एक होऊया, शिखरजी वाचवूया’ आवाज बुलंद केला. “केंद्र सरकार होश में आओ अपना आदेश वापस लो’ असा इशारा दिला.
“सम्मेद शिखरजी पवित्र स्थल् है, पर्यटन स्थल नहीं बनेगा “ असा निर्धार जैन समाजाने मोर्चातून दाखवून दिला. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहराच्या विविध भागांतून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला. नजर जाईल तिथपर्यंत आंदोलनात सहभागी झालेले नागरिक दिसत होते. या मोर्चाच्या निमित्ताने जैन समाजाने संघटित शक्ती दाखवून दिली. “सम्मेद शिखरजी जैनांच्या हक्काचे - नाही कुणाच्या बापाचे” असा इशाराही या मोर्चाद्वारे दिला. हातात जैन समाजाचा पंचरंगी झेंडा, डोक्यावर शिखरजी बचाव असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान करत जैन समाज सहभागी झाला. महिलांची संख्या प्रचंड होती. जैन समाज सहकुटुंब या मोर्चामध्ये सहभागी झाला. “केंद्रीय वन मंत्रालय शुद्धीवर या पर्यटनस्थळ नोटिफिकेशन रद्द करा’ हा फलक उंचावत जैन समाजाने भावना व्यक्त केल्या. या वेळी हा परिसर घोषणांनी दणाणून गेल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, जैन समाजाच्या आंदोलनाला कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डींगने पाठींबा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.