आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदय सामंत यांचे आश्‍वासन:जतमध्ये एमआयडीसी स्थापन करू

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जत तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त ४२ गावांतील दुष्काळग्रस्तांसाठी म्हैसाळ विस्तारित पाणी योजना तातडीने पूर्ण करून या गावांना पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे सांगतानाच या तालुक्यासाठी एमआयडीसी सुरू करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, सध्याचे राज्य सरकार या योजनेसाठी कायदेशीर तरतुदी करत नसल्याने भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी बहिष्कार घातला.

जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने तुकाराम महाराजांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्याला तातडीने भेट द्यावी, असा आदेश दिल्यानेच आपण जत दौऱ्यावर आलो आहोत असे सांगून सामंत म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीवर प्रेम करा, आम्ही तुमची समस्या सोडवू. त्यानंतर आपल्या कर्नाटकातील नातेवाइकांना महाराष्ट्रात स्थायिक करा, त्यानंतरच मुख्यमंत्री तातडीने जत दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचा विकासकामासाठी सत्कार करा, असा सल्लाही उदय सामंत यांनी दिला. कायम दुष्काळी असलेल्या या भागाला पाणीपुरवठा करणे ही राज्याची नैतिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...