आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आकाशातून कोसळणारी वीज येथील एका मोठ्या भागावर आदळते आणि जोरदार प्रकाशानंतर मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज येतो. या घटनेनंतर वीज कोसळलेल्या जागेवरुन मोठ्या प्रमाणात धूर निघत होता असा दावा व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. ही घटना 4 मे 2021 ची असून 21 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या घराच्या खिडकीतून व्हिडीओ बनवणारे राकेश राऊत म्हणतात की, क्षणभर मला एक मोठा स्फोट झाल्याचे वाटले. यामुळे मी आपल्या घराची खिडकी बंद केली होती.
200 मीटर अंतरावरून व्हिडिओ बनवणारी व्यक्तीही हादरली
व्हिडिओसह राकेशने लिहिले की, 'मी दुपारच्या जेवणानंतर डुलकी घेत होतो आणि आजूबाजूचे वातावरण वादळी होऊ लागले होते. माझ्या अपार्टमेंटच्या अगदी जवळ ढगांचा गडगडाट ऐकून मी उठलो आणि खिडकीतून बाहेर पाहिले. यानंतर मी माझ्या मोबाईल फोन कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग सुरू केले. यादरम्यान, आकाशातून एक तेजस्वी प्रकाश 200 मीटर अंतरावरील एका पृष्ठभागावर आदळला. राकेश म्हणतो की, हा स्फोट इतका जबरदस्त होता की, मलाही या स्फोटाने मोठा धक्का बसला. परंतु, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहाणी झाली नाही.
व्हिडिओमध्ये काय आहे?
49 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये 18 व्या सेकंदाच्या सुमारास वीज कोसळताना पाहिली जाऊ शकते. विजेच्या धक्क्यानंतर काही सेकंदांनी पक्ष्यांचा कळप तेथून उडताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत 8 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.