आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:अबब..तब्बल आठ कोटींचा दारुचा स्टॉक; तळीरामांकडून लॉकडाऊनची जोरदार तयारी

कोल्हापूर2 वर्षांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात दारुखरेदी वाढली. इतकेच नाही तर सात दिवसांच्या लॉकडाऊनसाठी तळीरामांनी तब्बल आठ कोटींचा स्टॉक करुन ठेवला. यातून विभागाने मोठी कमाई केली.

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे बाजारपेठा गजबजल्याच पण रोज बसणार्यांचे कानही हालू लागले. परिणामी शनिवारपासून दारु दुकानात गर्दी होवू लागली. रविवारी तर सोशल डिस्टंन्स पाळून दारू खरेदी झाली. शहर परिसरात ३कोटी ७५ लाख आणि जिल्ह्यात ४ कोटींचा टप्पा पार झाला. आता लॉकडाऊन वाढू शकतो असा समज करुन अनेकांनी अधिक खरेदी केली.

एका दिवसात ३ कोटी ८० लाख

लॉकडाऊनची घोषणा होताच शनिवारी एका दिवसात जिल्ह्यात ३ कोटी ८०  लाख रुपयांची दारू विक्री झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.

रोजची दारू विक्री

देशी दारू : साधारणतः २२ ते २५ हजार लिटर

विदेशी दारू : साधारणतः २०ते २२ हजार लिटर

बीअर : साधारणतः ८ ते १० हजार लिटर

गेल्या दोन दिवसांतील विक्री

देशी दारू : साधारणतः ९५ ते ९६ हजार लिटर

विदेशी दारू : साधारणतः ६५ हजार लिटर

बीअर : साधारणतः २३ ते २४ हजार लिटर

बातम्या आणखी आहेत...