आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कायद्यानुसार जगल्याने ईडीच्या नोटिसीला घाबरत नाही : जयंत पाटील

सांगली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजपर्यंत मी सनदशीर मार्गाने जगलो. सचोटीने काम केले. कोणतीही भानगड केली नाही. त्यामुळे ईडीच्या नोटिसीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. राज्यात पुन्हा महाविकास आघाडी मोडायचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चालू अाहेत. मात्र राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच शासन येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. नेर्ले (ता. वाळवा) येथे नंबर दोन सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. अप्पासाहेब माने अध्यक्षस्थानी होते. जयंत पाटील म्हणाले की, वाळवा तालुका क्रांतिकारकांचा असून त्याला संघर्षाचा इतिहास आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड उद्रेक असून आपण निवडणुकीची वाट बघूया.