आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राम पंचायत निकाल:कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक आघड्यांचीच सत्ता ;भुदरगडमध्ये शिवसेनेचा झेंडा

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघड्यांचीच सत्ता सिध्द झाली आहे. मतमोजणी निकालानंतर हे चित्र समोर आले. राज्याचे लक्ष लागलेल्या खानापूर ग्रामपंचायतीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आमदार प्रकाश आबिटकर यांनी जोरदार दणका दिला. हातकणंगले, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळ्यात स्थानिक आघाडी, कागलमध्ये महाविकास आघाडी तर गगनबावड्यात काँग्रेसची सरशी झाली आहे. आता सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भुदरगडमध्ये शिवसेनेचा झेंडा

भुदरगड तालुक्यात आमदार प्रकाश आबिटकर यांनी सेनेचा झेंडा फडकावला आहे.या विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आबिटकर याचे कौतुक केले येथे सेनेने 40 वर्षाच्या सत्तेला हादरा देत सर्वच्या सर्व जागा राज्याचे लक्ष वेधलेल्या खानापूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पॅनलने भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा धुव्वा उडवला. आमदार आमदार आबिटकर गटाला सहा जागा मिळाल्या येथे चंद्रकांत दादांना एक जागाही राखता आली नाही.

शिरोळकरांचा कौल यड्रावकरांना

शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीपैकी तब्बल 23 ग्रामपंचायतींवर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जनतेने साथ दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हाताला फारसे काही लागलेले नाही.

गडहिंग्लज, आजऱ्यात संमिश्र

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदार संघातील या दोन तालुक्यात स्थानिक पातळीवरच ग्रामपंचायत निवडणूक झाली. स्थानिक आघाड्यांना संमिश्र यश मिळाले. आजऱ्यामध्ये पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 10 ठिकाणी सत्तांतर तर 9 गावात सत्ता राखण्यात सत्ताधार्यांना यश आले.

कागलमध्ये मुश्रीफ गटाच्या 234 जागा विजयी

राजकीय विद्यापीठ मानले जाणार्या कागल तालुक्यात 40 ग्रामपंचयतींवर महाविकास आघाडीची सत्ता आली भाजपने दोन जागा ताब्यात घेतल्या. 9 ग्रामपंचातीवर समिश्र यश आले . मुश्रीफ गटाचे सर्वाधिक 234 सदस्या विजयी झाले. त्यापाठोपाठ खासदर मंडलीक गटाचे 97 माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाचे 87 तर भाजप जिल्हाध्यक्ष 76 उमेदवार विजयी झाले.

शाहूवाडी तालुक्यात सत्ताधार्यांना झटका

33 पैकी 13 ग्रामपंचायतीवर भगवा फडकला तर 8 ठिकाणी जनसुराज्य- काँग्रेस आघाडीत तर 11 गावात स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे. पन्हाळा तालुक्यातही स्थानिक आघाड्यांचेच वर्चश्व राहिले आहे.

करवीरमध्ये स्थानिक आघाड्यांचे पारडे जड

49 पैकी 8 ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर, 12 ठिकाणी सत्ताधारा, 27 ठिकाणी स्थानिक आघाडी तर दोन ठिकाणी त्रिशंकू स्थीती झाली आहे.

433 पैकी 47 ग्रामपंचायती यादी बिनविरोध झाल्या आहेत... त्यांचा समावेश करून जिल्ह्यातील साधारण पक्षनिहाय स्थिती अशी आहे.

राष्ट्रवादी : 134

काँग्रेस: 102

शिवसेना; 68

स्थानिक आघाडी : 72

भाजप :39

जनसुराज्य : 18

बातम्या आणखी आहेत...