आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:जिल्ह्यातील लाॅकडाऊन 23 मे रोजी रात्री 12 पासून शिथील होणार

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन २३ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून शिथिल करण्याचे संकेत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून त्याबाबत हालचाली सुरु असून याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.

जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरु असून सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत. दुध, औषधे, भाजीपाला वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. घरातच थांबूत या लॉकडाऊनला जिल्हावासियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. हे लॉकडाऊन आणखी आठ दिवस वाढणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र रविवारी रात्री १२ पासून लॉकडाऊन शिथिल करून ३१ मे पर्यंत राज्यशासनाच्या नियमांप्रमाणे (सकाळी ७ ते ११) सर्व व्यवहार सुरु राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...